शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (10:59 IST)

चिपळूण मध्ये NDRF चे मदत कार्य सुरु

महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून अवघ्या महाराष्ट्रात पाण्यामुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच भागात दरड कोसळून जीवित हानी झाली आहे.सध्या पावसाने अवघ्या महाराष्ट्राला वेढले आहे. सर्वत्र पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.NDRF चे पथक पूरग्रस्त भागात बचाव कार्य आणि मदतीला तातडीने दाखल झाले आहे.महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मध्ये शहराला पुराने वेढले आहे.या पुरात लोकांच्या घरात पाणी शिरले असून बरेच लोक या मध्ये अडकले आहे.लोकांना आपले जीव वाचविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहे.सध्या इथल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी NDRF ची चार पथके  हेलिकॉप्टर आणि बोटीच्या साहाय्याने मदतीला पोहोचले आहेत  असून नागरिकांना वाचविण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.या भागातून 20 जणांना सुखरूप काढण्यात आले आहे.
 
NDRFच्या व्यतिरिक्त रत्नागिरीतून जाणीव फाउंडेशन आणि हेल्पिंग हँड चे  कार्यकर्ते मदतीला पोहोचले आहेत.हे सर्व मिळून नागरिकांना वाचविण्याचे कार्य  करत आहे.
 
सध्या चिपळूण मध्ये 15 बोटी उपलब्द्ध असून त्यामधून बचाव कार्य सुरु आहे. सध्या चिपळूण मध्ये पूर आल्यामुळे मोबाईल आणि संपर्क यंत्रणा बंद आहे.तसेच वीज पुरवठा देखील खंडित झाला असून येथे मदत कार्यात अडथळे येत आहे