शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पोलीस पत्नीची दोन वर्षांच्या मुलाचा खून करून आत्महत्या

पुण्यातील मगरपट्टा हडपसर येथे सासूच्या छळास कंटाळून पोलिसाच्या पत्नीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे. जान्हवी अमित कांबळे आणि शिवांश अशी  मृतांची नावे आहेत.
 
जान्हवी कांबळे या हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमित कांबळे यांच्या पत्नी होत्या. अमित हे हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकात (डीबी) कार्यरत आहेत. अमित आणि जान्हवी या दाम्पत्याला शिवम (दोन वर्ष) हा मुलगा आहे. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास जान्हवी यांनी राहत्या घरी बेडरुममध्ये मुलाची हत्या करुन आत्महत्या केल्याचे उघड झाले.
 
आत्महत्येपूर्वी जान्हवी यांनी पतीला उद्देशून चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात त्यांनी म्हटले होते की, ‘अमित तू माझ्यावर प्रेम करतो, पण मला वेळ देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. सासू सुजाता ही माझा छळ करते' असे लिहिले आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे.