शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (07:59 IST)

आमदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप : कोविड सेंटर त्यांच्याकडून काढून घ्या ! त्या कोवीड सेंटरमध्ये काही ही घडू शकत….

राज्यात आमदार निलेश लंके यांची चर्चा सुरु आहे, त्यांच्या  अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील कोविड सेंटरमुळे लंके यांचे सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान आता लंके यांच्यावर आरोप होत आहेत. पारनेर तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक विडिओ टाकला आहे त्यात त्यांनी हे आरोप केले आहेत.
 
अविनाश पवार यांच्या व्हिडीओ तील आरोप पुढील प्रमाणे आहेत – सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे –
 
“११ तारखेला जो माझ्यासोबत प्रकार घडला. मदतीसाठी मी फोन नव्हता केला डॉ. गंधेंनी मला फोन केला होता, म्हणजे त्या गोष्टीवरुन लक्षात येतयं की पारनेर तालुक्यात अराजकता चालू आहे.
 
‘हम करे सो कायदा’ हे कुठेतरी थांबायला हवं. आमदार साहेबांनी पक्षाच नाव आणि माझ नाव ऐकल्यानंतर जे काही मला आई वरुन शिवी दिली. त्यासाठी मी माझ्या आयुष्यात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी कधीच माफ करु शकत नाही.
 
माझा पक्ष भंगार मी भंगार हे तुला येणारा काळचं खर दाखवून देईल. तुम्ही फकीर, जनतेचे सेवक, कैवारी काय काय उपाधी आता फक्त तुमचे पाय धुवून पाणीच प्यायचे नाही राहिलेतं. पाय धुवायला लागलेत पण पाणी नाही प्यायले.
 
आता जनेतेने ठरवा हा फकीर काय आहे ते आणि याची लोकांविषयी काय भावना आहे ते. अवघड परिस्थिती आहे.मी हा व्हिडिओ बनवयाचं कारण एकच आहे की बाबा हो त्या कोवीड सेंटरमध्ये संभाळून जा आणि माझ्या प्रशासनाला विनंती आहे की त्या कोवीड सेंटरमध्ये काही ही घडू शकत.
 
शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने जे कोवीड सेंटर आहे ते आरोग्य मंदीर नाहीये. तिथे घात होऊ शकतात. भविष्यात काही ही होऊ शकत तिथं. त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की ते पहिलं ताब्यात घ्या आणि या बाबाच्या, आमदाराच्या ताब्यात जर राहील तर हा कुठला राग कुठं पण काढू शकतो.
 
यंत्रणा हाताशी धरुन हा कोणत्या ही थराला जाऊ शकतो. त्यामुळे पहिलं ते ताब्यात घ्या. हा जो प्रकार चालू आहे तो थांबवा. याची भावना जर माझ्याविषयी अशी असेल तर हा राजकारणात कोणी समर्थक, विरोधक हे पेशंट असेल तर हा सोडू शकत नाही.
 
म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की, मी जे काही समाजिक काम करतोय या कामावर हा माणूस दुखवून जर माझ्या आईवर शिव्या देतोय, माझ्या पक्षाविषयी मला भंगार म्हणतोय तर आता जनतेनेच ठरवावं मी कसा आहे आणि काय ते आणि माझी एकच विनंती आहे की संभाळून रहा.
 
या माणसापासून माझ्या जीविताला ही धोका आहे. उद्या जर माझ काही झालं तर याला पूर्ण हा आमदार निलेश लंकेच जबाबदार राहणार. कारण त्याच्या मनात माझ नाव ऐकल तर हा रोष असेल तर हा कोणत्या पण थराला जाऊ शकतो.
 
माझी प्रशासनाला विनंती आहे आणि राजसाहेबांना पण विनंती आहे की साहेब जो माणूस २००८ पासून ते २०२१ पर्यंत प्रामाणिक काम करतोय जर त्या माणसाच्या वाट्याला अस येत असेल तर हे दुर्दैव आहे. आणि तालुक्यातील जनतेला माहित आहे अविनाश पवार काय आहे ते आणि काय न्हाय ते.