सांगलीत मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते भिडले !

Last Modified सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (15:10 IST)
सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेत असतानाच मोठा गोंधळ झाला.भाजप कार्यकर्त्यांनी अचानक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे तिथे जमलेल्या शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. शेवटी पोलिसांनी धाव घेऊन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीत आहेत. सांगलीच्या गावागावात जाऊन ते पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत आहेत.त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेत आले. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांचे निवेदनेही स्वीकारले. पण अचानक भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले आणि जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन सुरू केलं.
भाजप कार्यकर्त्यांनी अचानक गोंधळ घातल्याने शिवसैनिकही आक्रमक झाले. त्यांनीही भाजप विरोधात घोषणाबाजी सुरू केल्या. ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘आवाज कुणाचा,शिवसेने’चा अशा घोषणा देत शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी शिवसैनिक पुढे सरसावले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. गर्दीतील लोक सैरावैरा धावू लागले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा या परिसरातून निघून गेला.तर पोलिसांनी तात्काळ धाव घेत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री गेल्यानंतरही तब्बल 15 मिनिटं हा गोंधळ सुरूच होता. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर बसून निदर्शने करत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले. त्यांनी आमची निवेदने घेतली नाहीत.त्याआधीच निघून गेले. हा पूरग्रस्तांचा अपमान आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री घरोघरी जावून पूरग्रस्तांचे अश्रू पुसायचे. मात्र, हे मुख्यमंत्री आमचा अपमान करून गेले, असा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला.
भाजपचा हा दावा मात्र शिवसैनिकांनी फेटाळून लावला. मुख्यमंत्री सकाळपासून फिरत आहेत. लोकांच्या व्यथा वेदना जाणून घेत आहेत. सांगलीतील इतर गावातील लोकांनी शांतपणे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली. मात्र, भाजपने निवेदन न देता स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला, असा दावा शिवसेनेने केला आहे.
भाजप कार्यकर्त्यांची धरपकड
दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढील कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

बीडमध्ये महिलांचं भाकरी थापून अनोखं आंदोलन

बीडमध्ये महिलांचं भाकरी थापून अनोखं आंदोलन
एसटीचा संप चिघळला असला तरी काही ठिकाणी अजूनही संप सुरूच आहे. बीडमध्ये संप सुरू ठेवत ...

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
अरबी समुद्र आणि तामिळनाडू किनारपट्टी परिसरात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ...

New Covid-19 Guidelines : राज्य सरकारची नवी नियमावली

New Covid-19 Guidelines : राज्य सरकारची नवी नियमावली
महाराष्ट्र सरकारने आज नव्याने निर्बंधांची नियमावली जाहीर केली आहे

गुजरात भीषण अपघात: कच्छच्या आखातात दोन मोठी जहाजे आदळली,..

गुजरात भीषण अपघात: कच्छच्या आखातात दोन मोठी जहाजे आदळली,..
कच्छच्या खाडीत शुक्रवारी रात्री दोन जहाजांची टक्कर झाली. संरक्षण मंत्रालयाच्या ...

ओमीक्रॉन वेरिएंट विचारमंथन: PM मोदी यांनी आंतरराष्ट्रीय ...

ओमीक्रॉन वेरिएंट विचारमंथन: PM मोदी यांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले
कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन वेरिएंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ...