शिवसेना UBT यांनी आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड, सुनील प्रभू बनले मुख्य व्हीप
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना युबीटी च्या आमदारांची बैठक झाली या साठी पक्षाचे सर्व निवडून आलेले आमदार उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले असून दोन्ही सभागृहाच्या नेतेपदी आदित्य ठाकरे यांनी एकमताने निवड करण्यात आली.तसेच गटनेतेपदी भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांची स्वीप म्हणून निवड करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या जागा 8 हजार मतांनी जिंकली आहे. त्यांनी शिवसेने एकनाथ शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांचा पराभव केला. मनसेचे संदीप देशपांडे यांना 18 हजार 858 मते मिळाली.
भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत अनपेक्षित युती करण्याची धाडसी खेळी करणाऱ्या उद्धव ठाकरेंसमोर आता पक्षाला एकसंध ठेवण्याचे आव्हान आहे .
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात होती. ज्यामध्ये महायुतीने विधानसभेच्या 288 पैकी 230 जागा जिंकल्या आहेत. यामध्ये एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत. महायुतीचे तीन घटक पक्ष, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे अनुक्रमे राज्यातील आघाडीचे तीन पक्ष आहेत. याउलट महाविकास आघाडीला 288 जागांपैकी केवळ 46 जागा मिळाल्या आहेत. त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेना यूबीटीला 20 जागा, काँग्रेसला 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी-सपाला फक्त 10 जागा मिळाल्या आहेत.
Edited By - Priya Dixit