सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 सप्टेंबर 2021 (11:41 IST)

धक्कादायक ! केवळ 20 रुपयांसाठी मजुराचा खून

नाशिकच्या पंचवटीतील काल झालेल्या खुनाचा तपास पोलिसांनी लावला आहे.फक्त 20 रुपयांसाठी या तरुणाचे खून केल्याचे उघडकीस आले आहे.हा तरुण मजुरी करत होता.आरोपीने केवळ 20 रुपयांसाठी धारदार शस्त्राने गळा चिरून या मजुराचा निर्घृण खून केला.

सदर आरोपीने मजुराकडे बिडी पिण्यासाठी पैसे मागितले.मजुराने पैसे देण्यास नकार केला रागाच्या भरात येऊन आरोपीने धारदार शास्त्राने गळा चिरून मजुराचा खून केला. आरोपीला पोलिसाने अटक केली आहे.मयताच्या गळा चिरलेला असून सगळीकडे रक्ताचे डाग पडले होते.ही घटना जुना आडगाव नाक्यावरील राम रतन लॉज जवळ घडली आहे.
 
काही लोकांनी एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पंचवटी येथे सापडल्याचे पोलिसांना कळवले होते.पोलिसांनी या घटनेचा तपास लावला सीसीटीव्ही मध्ये  पंपावर एक व्यक्ती हात धुवत दिसला.पोलिसांनी शोध घेऊन या आरोपी पर्यंत पोहोचले.या आरोपी ने खून केल्याची कबुली केली आहे.