शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (11:57 IST)

संभाजी ब्रिगेडचे भाजपसोबत युतीचे संकेत

संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडला निवडणुकीसाठी युती करण्यासाठी भाजप हाच पर्याय असल्याच म्हटलय. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या राजकीय आघाडीकडून प्रकाशीत होणाऱ्या मराठा मार्ग या मासिकात लेख लिहून पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांची ही भुमिका मांडलीय. यांच्या लेखाने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हं आहेत. 
 
मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडली. संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या राजकारणात उतरायच ठरवल असून आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा अशी सुचना या लेखातून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना करताना भाजप हाच युती करण्यासाठी पर्याय असल्याच पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलय. मराठा सेवा संघाची स्थापना 1 सप्टेंबर 1993 रोजी अकोला या ठिकाणी करण्यात आली.
 
संभाजी ब्रिगेडची सामाजिक आणि राजकीय भुमिका ही नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राहिलीय. मात्र तरीही पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा विचार मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी रेखा खेडेकर या भाजपाच्या आमदार होत्या. परंतु तेव्हाही खेडेकर यांनी सातत्याने भाजपा आणि RSS च्या विचारसरणीवर टीका करत होते.