शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जून 2023 (21:09 IST)

अजब, आश्रमशाळेतील मुलींना पिण्यासाठी पाणी नाही म्हणून सुट्टी

water tap
Ashram school have no water to drink नाशिक जिल्ह्यात मोठा आदिवासी बहुल भाग आहे. त्यामुळे जिल्ह्यात शासकीय आश्रमशाळाची संख्याही मोठी आहे. या आश्रमशाळा मधून वारंवार कुठल्या तरी समस्येची ओरड विद्यार्थी करताना दिसून येत असतात. आता तर त्र्यंबकेश्वर  तालुक्यातील एका आश्रमशाळेत एक अजबच प्रकार समोर आला आहे. आश्रमशाळेतील मुलींना पिण्यासाठी पाणी नाही म्हणून  सुट्टी देण्यात आली आहे.
 
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव या ठिकाणी आदिवासी विकास विभागाची शासकीय आश्रम शाळा असून या ठिकाणी इ 1 ली  ते 12 वीपर्यंत फक्त मुली शिक्षण घेत आहेत. या शाळेला वैतरणा धरणातून स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना करण्यात आली  आहे. मात्र धरणाचा साठा कमी झाल्याने विहिरीत पाणी कमी आहे. हेे पाणी सर्व मुलींना पुरणार नाही म्हणून इ. 1 ली ते 10  वीच्या वर्गांना सुटी देण्यात आली आहे.
 
 तर इ 11वी आणि 12 वी चे वर्ग सुरू आहेत. वैतरणा धरणाचे मुंबईला पाणी जाते पण ज्या ठिकाणी आदिवासी मुली शिक्षण घेतात त्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही म्हणून शाळाच बंद करून या सर्व मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. एकीकडे आदिवासी भागातील मुले शाळेत यावे, या मुलांची शिक्षण घ्यावे यासाठी शासनस्तरावर आदिवासी विभागाकडून आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी अनेक शेक्षणिक योजना आदिवासी विभागाकडून राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शाळेच्या यंत्रणेने मुलींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याऐवजी इयत्ता 1 ली ते 10 वीचे वर्ग बंद केले. 
===========