शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (15:51 IST)

राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या मोहिमेचं केल कौतुक

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. या अधिवेशनाची सुरूवात ही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाला सुरूवात झाली. यामध्ये राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मोहिमेचं कौतुक केलं. 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढताच मुख्यमंत्र्यांनी 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम राबवली. या मोहिमेत प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत कोरोनाचे नियम पाळायचे असं आवाहन केलं होतं. या मोहिमेला महाराष्ट्रात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. याच मोहिमेचं राज्यपाल कोश्यारी यांनी अधिवेशनात कौतुक केलं आहे. 
 
कोविड नियंत्रणासाठी महाराष्ट्रात विविध उपाययोजना राबवल्या त्या देशाला मार्गदर्शक ठरल्या आहेत. तसेच आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या या मोहिमांचा फायदाच झाल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात झाली. जीएसटी भरपाईपोटी राज्याला केंद्राकडून २९ हजार कोटी रूपये येणं असल्याचं राज्यपालांनी अभिभाषणात म्हटलं आहे.