शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (15:49 IST)

राज्यातील पहिली लिंग बदल ओपीडी मुंबईत सुरु

मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने बीडचे पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर केलेल्या यशस्वी लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर, याच ठिकाणी पूर्ण वेळ लिंग बदल करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांकरिता स्वतंत्र ओपीडी विभाग सुरू केला आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच विभाग ठरला असून रुग्णालयाने यासोबतच इंटरसेक्स वॉर्डही सुरू केलाय. ओपीडी व वॉर्डाचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले आहे. बीडच्या साळवे यांचा मोठा सहभाग आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना जेव्हा येथे लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आले होते तेव्हा त्यांना कुठल्या वॉर्डात ठेवायचे याबाबत रुग्णालय प्रशासनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना त्यावेळी अतिविशिष्ट व्यक्तींच्या सूटमध्ये ठेवण्यात आले होते. वैद्यकीय अधिक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले की लिंगबदलाकरिता आमच्याकडे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयाने इंटर सेक्स वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याप्रकारचा उपक्रम राबवणारे हे पहिलेच रुग्णालय असणार आहे. रुग्णालयाकडे आतापर्यंत १३ रुग्णांनी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेबाबत विचारणा केली आहे.