शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (08:38 IST)

तरुणाने आपल्या घरावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील एका तरुणाने चक्क आपल्या घरावरच पाच फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा  पुतळा उभारला आहे. तरूणाच्या या आदर्शवत संकल्पनेचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचून तरुण पिढीने त्या दिशेने वाटचाल करावी, या उद्देशाने आर्णी येथील सचिन भोयरया तरुणाने चक्क आपल्या घरावरच पाच फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा  पुतळा उभारला आहे. आर्णी येथे सचिन भोयर  याचे वास्तव असून, लहान पणापासून शिवाजी महाराजांचे विचार त्याने अंगिकारले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे  पूजन केल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही. घर बांधते वेळी पाच फुट उंचीचा पुतळाही बसविला.
 
19 फेब्रुवारीला रयतेच्या राजाची जयंती  साजरी करण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे. शिवमहोत्सवदेखील साजरा केला जात आहे. परंतु, सचिन भोयर हा केवळ एकच दिवस नाही तर वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजन करतो. त्यानंतरच आपल्या कार्याला सुरुवात करतो.पुतळ्यावरून राज्यात राजकारण होताना दिसते. त्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या घरीच छत्रपती आणि राष्ट्रमाता जिजाऊंचा पुतळा उभारावा. तरुणाईने छत्रपतींचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारावा असे आवाहन सचिन भोयर  याने केले आहे.