शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2022 (21:23 IST)

चक्क एक लाख सात हजाराचे खाद्य तेल डब्याची चोरी

नाशिकमध्ये भुरट्या चोरट्यांनी आता किराणामालाच्या दुकानात लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातून चोरट्यांनी तब्बल एक लाख सात हजाराचे खाद्य तेलाचे डबे चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी दुकान मालक महेश ठक्कर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धामुळे आता खाद्यतेलाचे मोठ्या प्रमाणात भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता चोरट्यांनी सोने-चांदी कडे दुर्लक्ष करून  खाद्यत्यालाकडे आपला मोर्चा वळवलाय की काय? असेच या घटनेकडे पाहता प्रश्न पडत आहे. पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीत महेश ठक्कर यांचे श्रीराम ट्रेड्स नावाचे होलसेल किराणा दुकान आहे.
 
दरम्यान या दुकानात तेलाचे साहित्य ठेवलेले असते. यामध्ये तेलाचे डबे, तेल पिशव्या, पिशव्यांचे बॉक्स आदी साहित्य ठेवलेले होते. गुरुवारी ते शुक्रवारच्या रात्री चोरट्यांनी दुकांनाच्या मागच्या बाजूच्या बाथरूमचा लाकडी दरवाजा तोडून दुकानात प्रवेश केला. यावेळी १५ किलोचे १८ खाद्य तेलाचे डब्बे, खाद्य तेलाच्या १० पिशव्या असे ५५ बॉक्स १२ पिशव्या, असा एकूण तब्बल ०१ लाखाहून अधिकचा माल चोरून नेला आहे