शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (21:20 IST)

मराठी बोलताना लाज वाटायची गरज नाही : राज ठाकरे

२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मराठी भाषेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात आता मराठी भाषेचा कायम आग्रह धरणाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी टिकवण्यासाठी आधी मराठीत बोलणं गरजेचं आहे. मराठी बोलताना लाज वाटायची गरज नाही असं मत व्यक्त केलं.
 
एका मुलाखतीत राज ठाकरे ‘पुष्पा’चित्रपटा विषयी म्हणाले, “तो चित्रपट जेव्हा हिंदीत आला नव्हता. तेव्हा तुमच्यातले आणि माझ्या काही ओळखीच्या लोकांनी तेलगूमध्ये पुष्पा पाहिला आहे. माझा एक मित्र आला आणि म्हणाला पुष्पा, मला पहिले कळलं नाही कारण मला ते काय आहे हे माहित नव्हतं, तेव्हा तो चित्रपट नुकताच आला होता. तो मला म्हणाला की पुष्पा चित्रपट बघ आणि तेलगू चित्रपट आहे. मी म्हणालो, तू तेलगूत पाहिला. तर चित्रपटाला भाषेची गरज नाही असं त्याने सांगितलं. चित्रपट पाहिल्यावर मला कळलं की भाषेची गरजच नाही त्याला.”