शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जून 2019 (17:04 IST)

मुख्यमंत्र्यांच्या काकू म्हणतात, झाडे विधर्भात नको मराठवाड्यात लावा, वनमंत्री मुनगंटीवार यांच्यावर निशाणा

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेला भाजपातील ज्येष्ठ नेत्याने घरचा आहेर देत सल्ला दिला आहे. तुम्ही विदर्भात झाडं लावू नका, मराठवाड्यात लावा, असे माजी मंत्री आणि भाजप नेत्या शोभाताई फडणवीस यांनी सल्ला दिला आहे. असे म्हणत त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 
 
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सध्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी आढावा बैठका घेतली असून, त्यांच्याच पक्षातून त्यांच्या या मोहिमेला टीकेचे धनी व्हावे लागले आहे. त्यांच्याच पक्षाच्या माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी टीका केली आहे. त्या म्हणतात की “विदर्भात आधीच 35 टक्क्यांच्यावर जंगल असून, जंगलामुळे आमचे सिंचन प्रकल्प पूर्ण होत नाही. त्यामुळे विदर्भात झाडं लावू नका, तर मराठवाड्यात लावा तिथे अधिक गरज आहे.” अशी भूमिका शोभाताई फडणवीस यांनी मांडली आहे. वृक्षारोपणासाठी वनविभागाने खोदलेले खड्डे बुजवण्याचे आवाहनी शोभाताईंनी शेतकऱ्यांना केले आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि शोभाताई फडणवीस यांच्यातील संघर्ष फार जुना असून, शोभाताई या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आहेत. त्यामुळे या नव्या वादाचाही चर्चा सध्या विदर्भात रंगली आहे. त्यामुळे आता वनमंत्री या टीकेला कसे उत्तर देतात हे पहावे लागणार आहे.