रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जून 2022 (08:42 IST)

एशियन चॅम्पीयन कुस्ती स्पर्धेत मनमाड येथील आचपळ कुस्ती मध्ये ठरला सुवर्ण पदाचा मानकरी

wrestling
कजाकिस्थान येथे सुरु असलेल्या एशियन चॅम्पीयन कुस्ती स्पर्धेत मनमाड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जिमखाना कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा खेळाडू शुभम हरी अचपळे या युवकाने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून भारताचा तिरंगा डौलाने फडकावला. त्याला त्याचे गुरुवर्य माजी नगराध्यक्ष साईनाथभाऊ गिडगे यांचे मार्गदर्शन लाभले. शुभम याने सुवर्ण पदक जिंकल्या नंतर सावरकर जिमखानातर्फे त्याच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 
 
शुभम अचपळे हा चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील एका शेतकरी कुटूंबातील कुस्तीपटू आहे. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकुल असतांनाही त्यांचे वडील हरिभाऊ अचपळे व आई सौ. मंदाकिनी अचपळे यांनी शुभमला घरातून कुस्तीसाठी प्रोत्साहीत केले. नगरसेवक साईनाथ गिडगे यांनी शुभमला व त्याच्या लहान भावाला वयाच्या ६ व्या वर्षी दत्तक घेतले. त्यानंतर शुभमने साईनाथ गिडगे यांच्या तालीमीत कुस्तीचे धडे गिरविले व आज त्याने कजाकिस्थान येथे ४८ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावून देशाचे व आपल्या मनमाड शहराचे नाव उंचावले आहे. शुभमच्या या घवघवीत यशाबद्दल वीर सावरकर नगर शिवसेना व मित्र मंडळातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.