आईच्या सांगण्यावरून सिद्धार्थ शुक्लाने पहिल्यांदा मॉडेलिंग केले

बिग बॉस विजेता आणि टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे 2 सप्टेंबर 2021 रोजी निधन झाले. जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...

social media

सिद्धार्थला इंटिरिअर डेकोरेशनची खूप आवड होती. त्यांनी 'रचना संसद स्कूल ऑफ इंटिरियर डिझाईन'मधून इंटिरियर डिझायनिंगमध्ये पदवी प्राप्त केली होती

सिद्धार्थला अभिनेता बनायचं नव्हतं तर बिझनेसमन व्हायचं होतं. पण 2004 मध्ये आईच्या सांगण्यावरून एका मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला

2008 मध्ये तुर्कीमध्ये झालेल्या वर्ल्ड बेस्ट मॉडेलिंग कॉन्टेस्टमध्ये सिद्धार्थने भाग घेतला होता. ही स्पर्धा जिंकून त्याने देशाचे नाव उंचावले होते

सिद्धार्थने 2008 साली 'बाबुल का आंगन छूटे ना' मधून करिअरला सुरुवात केली होती

सिद्धार्थने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले पण त्याला खरी ओळख 2012 मध्ये आलेल्या 'बालिका वधू' या शोमधून मिळाली

सिद्धार्थ शुक्ला अनेक रिअॅलिटी शोचा भाग होता. तो खतरों के खिलाडी 7 बिग बॉस 13 सारख्या शोचा विजेताही ठरला

सिद्धार्थने त्याच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातून केली होती