जिमला जाण्यापूर्वी कॉफी पिणे योग्य आहे का?

जिमला जाण्यापूर्वी तुम्हीही उर्जेसाठी कॉफी पिता का? पण ते खरोखर फायदेशीर आहे की तुम्हाला हानी पोहोचवू शकते? जाणून घ्या....

कॉफीमधील कॅफिन तुम्हाला सतर्क आणि सक्रिय बनवू शकते.

ज्यामुळे वर्कआउटमध्ये चांगला फायदा होतो.

जर तुम्हाला जास्त व्यायाम केल्यानंतर स्नायूंमध्ये वेदना होत असतील तर कॉफी पिल्याने आराम मिळू शकतो.

पण कॉफी प्रत्येकासाठी नाही. काही लोक कॅफिनबद्दल संवेदनशील असतात.

जास्त कॅफिनमुळे हृदयाचे ठोके जलद होऊ शकतात.

याचा तुमच्या झोपेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

जर तुम्हाला जिमच्या आधी कॉफी प्यायची असेल तर १५०-२०० मिलीग्राम कॅफिन (एक कप ब्लॅक कॉफी) चांगली मानली जाते.

व्यायामाच्या ३० मिनिटे आधी तुम्ही कॉफी किंवा चहा पिऊ शकता.

साखर आणि क्रीमशिवाय कॉफी पिणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

जर तुम्हाला उच्च रक्तदाब, चिंता किंवा आम्लपित्त यांचा त्रास असेल तर जिम करण्यापूर्वी कॉफी पिणे टाळा.