परदेशात जाण्यासाठी Passport आवश्यक आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पासपोर्टच्या या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय?

सामान्य भारतीयांना सरकारी अधिकाऱ्यांपासून वेगळे करण्यासाठी सरकारने पासपोर्टचे वेगवेगळे रंग ठेवले आहेत.

यामुळे कस्टम अधिकारी आणि इतर देशांतील पासपोर्ट तपासणार्‍या अधिकार्‍यांना सोपे जाते.

सामान्य भारतीय नागरिकांसाठी निळ्या रंगाचा पासपोर्ट जारी केला जातो.

जे लोक फक्त 10वी पर्यंत शिकलेले आहेत त्यांना केशरी रंगाचा पासपोर्ट दिला जातो.

अधिकृत कामासाठी परदेशात जाणाऱ्या अधिकाऱ्यांना पांढरा पासपोर्ट दिला जातो.

भारतीय मुत्सद्दी आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना मेहरून पासपोर्ट जारी केला जातो.

मेहरून पासपोर्ट धारकांना परदेशात जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही.