सावधान! कानात फुटू शकतात इअरबड्स ?
जर तुम्हीही बराच काळ इअरफोन आणि हेडफोन वापरत असाल तर ही वेबस्टोरी तुमच्यासाठी आहे...
तुमचे आवडते इअरबड्स तुमच्यासाठी धोका निर्माण करू शकतात असा विचार तुम्ही कधी केला आहे का?
अलिकडे, इअरबड्स आणि हेडफोन्सच्या स्फोटामुळे लोक जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहे.
वारंवार चार्जिंग केल्याने बॅटरी गरम होते आणि स्फोट होण्याचा धोका वाढतो.
तीव्र सूर्यप्रकाशात किंवा अति उष्णतेमध्ये इअरबड्सचा जास्त वापर केल्याने बॅटरीचे नुकसान होते.
घामाने किंवा पाण्याने ओले झालेले इअरबड्स शॉर्ट सर्किटचा धोका वाढवतात, ज्यामुळे स्फोट होऊ शकतो.
कानात इअरबड्स तासनतास ठेवून झोपल्याने बॅटरी गरम होतेच पण कानांनाही नुकसान होते.
लोकल चार्जरने चार्ज केल्याने बॅटरी खराब होऊ शकते आणि स्फोट होण्याचा धोका वाढू शकतो.
यामुळे कमी ऐकू येण्याच्या आणि बहिरेपणाच्या तक्रारी देखील होऊ शकतात.
तुम्हालाही दिवसभर इअरबड्स घालण्याची सवय आहे का? जर तुम्हाला स्टोरी आवडली तर नक्की शेअर करा...