दमा रुग्णांनी दिवाळीत अशी काळजी घ्यावी

दिवाळी जवळ आली की शहरांमध्ये प्रदूषण, धूर आणि धूळ अधिक असते, अशा परिस्थितीत दम्याच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे

घर साफ करण्यापासून दूर राहा, शक्य असल्यास साफसफाईसाठी कामगारांची मदत घ्या.

साफसफाई करताना, तुम्ही धुळीच्या कणांच्या संपर्कात येऊ शकता, जे तुमच्यासाठी हानिकारक आहे.

फटाके, फुलबाज्या, आणि झाड यांच्यापासून निघणारा धूर तुमच्यावर वाईट परिणाम करू शकतो.

तुम्ही जास्तीत जास्त वेळ घरात घालवलात तर बरे होईल, कारण बाहेरील फटाक्यांचा धूर संपूर्ण वातावरणात पसरतो.

इनहेलर आणि औषधे नेहमी सोबत ठेवा. तुम्हाला त्यांची कधीही गरज पडू शकते.

आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या.

तेलकट आणि मसालेदार अन्न खाणे टाळा आणि शक्य तितके पाणी प्या जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील.

ज्या ठिकाणी भरपूर फटाके फोडले जात आहेत अशा ठिकाणी जाऊ नये.