हाताची चरबी कमी करण्यासाठी या गोष्टी करा
आजच्या काळात पोटाच्या चरबीसोबत हाताच्या चरबीची समस्याही वाढू लागली आहे. या टिप्स फॉलो करून कमी करा.
ज्या महिला लठ्ठ असतात, त्यांच्या हातावरील चरबी वाढल्यामुळे त्यांचे हात जाड आणि लटकलेले दिसतात.
कधीकधी टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यामुळे आणि वजन न उचलल्यामुळे चरबी वाढते.
लोंबकळते हात कमी करण्यासाठी, आपण प्रथिनेयुक्त पदार्थ खावेत.
भुकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथिनांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे.
फळे, भाज्या, कडधान्य, नट, बिया आणि शेंगा हे फायबरचे चांगले स्रोत आहेत.
फायबरयुक्त पदार्थ हळूहळू पचतात, त्यामुळे भूक कमी लागते. त्यामुळे तुमच्या शरीरात चरबी वाढत नाही.
जर तुम्हाला चरबी कमी करायची असेल तर जास्त पाणी प्यावे. दररोज भरपूर पाणी प्यावे.
हातांची चरबी कमी करायची असेल तर साखरेचे सेवन करू नका.
फुलपाखरू व्यायाम किंवा कात्री व्यायाम नियमितपणे करावा.