या घरगुती उपायांनी कंबर दुखीपासून आराम मिळेल

जास्त वेळ बसल्याने किंवा चुकीच्या आसनामुळे पाठदुखी होऊ शकते, या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हे उपाय करा

कंबर दुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्हीओवाचा वापर अनेक प्रकारे करू शकता.

एका ग्लास पाण्यात रात्रभर ओवा भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्याने कंबर दुखीपासून आराम मिळतो.

कंबर दुखीपासून आराम मिळण्यासाठी गरम दुधात हळद मिसळून प्यायल्याने आराम मिळतो.

तेल गरम करून त्यात थोडी हळद घालून मसाज केल्यास खूप आराम मिळतो.

कंबरदुखी झाल्यास खोबरेल तेल गरम करून मसाज केल्याने वेदनेपासून आराम मिळतो.

कंबर दुखीच्या वेळी अद्रक गरम तेलात मिसळून मालिश केल्यास वेदना कमी होण्यास खूप फायदा होतो.

तसेच आल्याच्या सालीपासून तेल बनवून कंबरेला लावल्यानेही आराम मिळतो.

कंबरदुखी हे कधीकधी गंभीर डिस्कशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते.

घरगुती उपाय करूनही तुम्हाला वेदनांपासून आराम मिळत नसेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.