कच्च्या हळदीचे आरोग्यदायी फायदे

webdunia

कच्ची हळद आल्यासारखी दिसते. ते रसात घालून, दुधात उकळून, तांदळाच्या पदार्थात घालून, लोणचे बनवून, चटण्या बनवून आणि सूपमध्ये घालून वापरता येते.

webdunia

कच्च्या हळदीमध्ये कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म असतात. हे हानिकारकरेडिएशनचा संपर्कात आल्याने होणाऱ्या ट्यूमर पासून देखील संरक्षण करते.

webdunia

कच्ची हळद रॅडिकल्स चा नायनाट करते आणि संधिवात ने होणाऱ्या सांध्यातील वेदनेमध्ये आराम देते.

webdunia

कच्च्या हळदीमध्ये इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे.

webdunia

इन्स्युलिनच्या व्यतिरिक्त हे ग्लूकोजला नियंत्रित करतं, ज्या मुळे मधुमेहाच्या दरम्यान देण्यात आलेल्या उपचाराचा प्रभाव वाढतो.

webdunia

कच्च्या हळदीमध्ये लिपोपोलिसॅकराइड नावाचा घटक असतो, जो शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो.

webdunia

कच्ची हळद शरीरातील बॅक्टेरियाच्या समस्येस प्रतिबंध करतेआणि शरीराला ताप येण्यापासून वाचवते.

webdunia

कच्च्या हळदीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यात संसर्गाशी लढण्याचे गुणधर्म देखील असतात.

webdunia

यात सोरायसिस सारख्या त्वचेशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याचे गुणधर्म आहेत. कच्ची हळद त्वचा चमकदार ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे.

webdunia

कच्च्या हळदीपासून बनवलेला चहा हे अतिशय फायदेशीर पेय आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

webdunia

कच्च्या हळदीमध्ये वजन कमी करण्याचा गुणधर्म असतो. त्याचा नियमित वापर वजन कमी करण्याचा वेग वाढवतो.

webdunia

कच्ची हळद लिव्हरला देखील निरोगी ठेवते. हळदीच्या वापरामुळे लिव्हरचे कार्य सुरळीत राहते.

webdunia

चेतावणी: गरोदर महिलांनी कच्ची हळद वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा. जर एखाद्याची शस्त्रक्रिया व्हायची असेल तर त्यांनी कच्च्या हळदीचे सेवन करू नये. हाय डोझची औषधे घेत असलास तरीही कच्च्या हळदीचे सेवन करू नये.

webdunia