कवडी पासून रुपया कसा झाला?

रुपये" हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाचा आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा शब्द कसा आला? चला जाणून घेऊया...

प्राचीन काळात कवडी(एके प्रकाराचे शिंपले)चलन म्हणून वापरला जात असे.

फुटकी कवडी म्हणजे निरुपयोगी किवा तुटलेले चलन ते समाजातील सर्वात कमी मूल्याच्या गोष्टीचे प्रतीक बनले.

कवडी नंतर दमडी, चलन वापरात आले, ज्याचे मूल्य कवडीपेक्षा थोडे जास्त होते.

आज देखील एका दमड़ीचा फायदा झाला नहीं अशा वाक्प्रचारांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो.

त्या नंतर धेला आला जो जुन्या व्यापाराच्या काळात लहान खरेदीसाठी वापरला जात असे.

धेला पासून पाईचे चलन सुरु झाले पाई म्हणजे एक लहान भाग खूप लहान पण उपयोगी

आजच्या काळात,पाई पाई चा हिशोब ठेवणे' सारखे वाक्प्रचार संपूर्ण हिशोब ठेवण्यासाठी वापरले जातात.

त्यानंतर पैसा आला, जो पाईपेक्षा जास्त मौल्यवान होता आणि व्यापारात त्याची भूमिका मोठी होती; तो आजही आपल्या चलनाचा एक भाग आहे.

ब्रिटिश राजवटीत पैशानंतर 'आना' खूप लोकप्रिय झाले. 1 रुपया = 16 आणे. ज्यामुळे 'सोळा आना सच सारखे वाक्प्रचार तयार झाले.

या सर्व चलना नंतर रुपया'चा जन्म झाला. 1540 मध्ये शेरशाह सुरीने चांदीच्या नाण्याला 'रुपया' असे नाव दिले. हे नाव 'रूप्यक' या संस्कृत शब्दापासून आले आहे.