आल्याचं सेवन कशा प्रकारे करावे?
आल्याचं सेवन केल्याने सर्दी खोकला आणि थंडीपासून बचाव होतो. जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत-
webdunia
चहासोबत - आलं किसून चहामध्ये उकळून प्या
पाण्यासोबत - एक ग्लास पाण्यात आल्याचे काही तुकडे टाकून पाणी उकळून घ्या आणि कोमट झाल्यावर याचे सेवन करा
भाज्यांसोबत - आलं किसून भाज्यांमध्ये घालून शिजवून खाता येतं
मधासोबत - आलं ठेचून त्यातून एक चमचा रस काढून अर्धा चमचा मधासोबत मिसळून प्यावे.
चटणीसोबत - आलं पिसून त्याची पेस्ट तयार करा आणि चटणीत मिसळून याचे सेवन करु शकता
कोशिंबिरीसोबत - किसलेलं आलं कोशिंबिरमध्ये मिसळून खाऊ शकता
गुळासोबत - आल्याचे काही तुकडे गुळात मिसळून देखील सेवन करु शकता
Disclaimer- घरगुती उपाय माहितीसाठी आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन अमलात आणा.