Janmashtami Dahi Handi 2023 : मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह
बालगोविंदांपासून ते तरुण, वयस्करांनी आजच्या या दहीहंडीत उत्साहाने सहभाग नोंदवला
Girish Srivastav
दहीहंडी हा एक लोकप्रिय सांस्कृतिक खेळ आहे जो भगवान कृष्णाच्या जयंती दरम्यान साजरा केला जातो.
मुंबई, ठाण्यात आज दहीहंडीचा (Dahihandi 2023) चांगलाच उत्साह दिसून आला.
चाळीतील गल्लींपासून ते राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या लाखोंच्या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
मुंबई, ठाण्यात राजकीय नेत्यांकडून दहीहंडीचे आयोजन
टेंबी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. या ठिकाणीही अनेक गोविंदा पथकांनी हजेरी लावली.
मुंबईत आज भाजपच्या वतीने 400 दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दहीहंडी उत्सवासाठी वेळ वाढवून रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलीये.