Kala Ghoda Art Festival 2023 कलाप्रेमींसाठी अतिशय खास काळा घोडा महोत्सव
काळा घोडा महोत्सव हा नृत्य, कला आणि संगीत प्रेमींसाठी एक अतिशय खास उत्सव आहे
दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या शनिवारी सुरू होतो आणि दुसऱ्या रविवारी संपतो
यंदा 4 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून तो 12 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे
हा एक कला महोत्सव आहे जो 1999 मध्ये काळाघोडा संस्थेने सुरू केला होता
दक्षिण मुंबई परिसरात काळ्या घोड्याचा पुतळा असलेल्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो
महोत्सवाला भेट देण्याची वेळ सकाळी 10 ते रात्री 10 अशी आहे
या महोत्सवात जाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तिकीट काढावे लागणार नाही
दरवर्षी येथे 100 ते 150 स्टॉल लावले जातात
काळा घोडा फेस्टिव्हल मध्ये अद्भुत कलाकारांची सुंदर कलाकृती आणि परफॉर्मन्स पाहण्याची संधी मिळते
येथे मोठ्यांसोबतच मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी अनेक उपक्रम उपलब्ध आहेत