केसांना मूग डाळ लावण्याचे फायदे जाणून घ्या

लांब आणि दाट केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे, त्यामुळे केसांच्या वाढीसाठी तुम्ही मूग डाळ हेअर मास्क वापरू शकता.

यासाठी 1/4 कप मूग डाळ रात्रभर भिजत ठेवा.

तसेच एक चमचा मेथी दाणे भिजवा.

आता मूग डाळ आणि मेथीदाणे मिक्सरमध्ये टाका.

तसेच 1-2 चमचे लिंबाचा रस घालून पेस्ट बनवा.

ही पेस्ट केसांवर 30-60 मिनिटे लावा.

यानंतर केस सौम्य शाम्पू आणि पाण्याने धुवा.

ही पेस्ट लावल्याने कोंड्याची समस्या कमी होते.

मेथी आणि लिंबाचा रस केसांत चमक आणतो.

तसेच, ही पेस्ट केसांची वाढ करण्यासाठी उपयुक्त आहे.