परफ्यूम लावण्याचे शौकीन असाल तर त्याचे तोटे जाणून घ्या.

अनेकांना लक्झरी आणि चांगले परफ्यूम लावणे आवडते, परंतु त्यांचा जास्त वापर आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतो.

परफ्यूममध्ये अनेक प्रकारचे हानिकारक घटक वापरले जातात.

त्यात इथेनॉल, आयसोप्रोपाइल अल्कोहोल आणि इथिलीन ग्लायकॉल सारखे घटक असतात.

हे सर्व घटक परफ्यूमचा सुगंध टिकवण्यासाठी वापरतात.

त्यामुळे परफ्यूमच्या वापरामुळे नाकात खाज होणे आणि अस्वस्थता होऊ शकते .

याच्या वापरामुळे अनेकांना सायनसचा त्रास होऊ शकतो.

परफ्यूममधील हानिकारक घटक मुळे दम्याची लक्षणे उद्भवू शकतात.

यातील रसायनांमुळे हार्मोनल असंतुलन देखील होऊ शकते.

तसेच परफ्युमच्या वापरामुळे अनेकांना सुस्ती आणि उर्जेची कमतरता जाणवते.

याच्या वापरामुळे त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात.