हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका कसा टाळायचा?
हिवाळ्यात हृदयविकाराचा त्रास अधिक होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण हे टाळण्यासाठी हे काही उपाय...
थंड तापमानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
हिवाळ्यात, हवामानातील बदल, सण-उत्सव आणि इतर कारणांमुळे तणाव वाढतो आणि हृदयावर वाईट परिणाम होतो.
ज्या लोकांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला असेल, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल असेल त्यांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.
थंडीत अचानक जड व्यायाम केल्याने हृदयावर दबाव वाढू शकतो.
त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी रोज काही व्यायाम, ध्यान आणि योगासने करा.
हिरव्या भाज्या, फायबरयुक्त फळे आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड असलेले पदार्थ खा.
थंड वातावरणात धूम्रपान आणि मद्यपान केल्याने रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. या सवयींपासून दूर राहा.
अस्वीकरण: शंका असल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.