महाराष्ट्रातील या सुंदर पर्यटन स्थळांना पावसाळ्यात नक्कीच भेट द्या

महाराष्ट्रातील काही मनमोहक अशी पर्यटन स्थळे आहेत ज्या ठिकाणी पावसाळ्यात हजेरी लावायलाच पाहिजे तर जाणून काही स्थळे

Webdunia

लोणावळा :

लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.

Webdunia

खंडाळा :

खंडाळा हा भोर घाटाच्या एका टोकावर आहे.जे डेक्कन पाठार आणि कोकणच्या मैदानाच्या दरम्यान रस्त्यावर जोडला जाणारा घाट आहे. या घाटातून सडक आणि रेल्वे वाहतूक जाते.

Webdunia

ताम्हिणी घाट :

गोवा महामार्गावर मुंबईपासून सुमारे 140 किमी अंतरावर हिरवेगार सौंदर्य,खोल दऱ्या,मुळशी धरण, डोंगरा वरून पडणारे धबधबे हे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

Webdunia

भीमाशंकर :

घनदाट जंगल आणि तीर्थक्षेत्र असल्यामुळे हे प्रमुख पर्यटन स्थळ बनत आहे.भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.

Webdunia

इगतपुरी :

या परिसरातील वाहणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात तसेच कसारा घाटातील धुके अनुभवणे एक रोमांचकारी अनुभव आहे.

Webdunia

पाचगणी :

पांच डोंगराच्या समूहावर असल्यामुळे हे ठिकाण पाचगणी म्हणून ओळखले जाते. खोल दऱ्या धबधबे, कमलगड, टेबल लँड, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध बघण्यासारखी स्थळे आहेत.

Webdunia

माथेरान :

माथेरानला देशातील सर्वात लहान हिल स्टेशनचा दर्जा मिळालेला असून ढगांनी वेढलेले पर्वत आणि पर्वतातून पडणारे धबधबे अतिशय सुंदर अनुभूती देतात.

Webdunia