पावसाळ्यात तुमच्या शरीरात संसर्ग होण्याचा धोका असतो. बहुतेक रोग पावसाळ्यात पाण्यामुळे होतात त्यासाठी कोणत्या गोष्टी करणे टाळावे.
साध्या पाण्याचे सेवन न करता फिल्टर केलेले किंवा उकळलेले पाणी पिणे आवश्यक आहे.
पावसात चालणे टाळा तसेच छत्री किंवा रेनकोटने स्वतःला सुसज्ज करा.
विजेच्या तारांना कधीही स्पर्श करू नका कारण ओलाव्यामुळे विजेचा धक्का बसण्याची शक्यता जास्त असते. तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करा.
किडे आणि किटकांविरुद्ध खबरदारी घ्या त्यासाठी घरात फव्वारणी करून घ्या.
तुमच्या घरात आणि आजूबाजूच्या ठिकाणी पाणी साचू देऊ नका. हे डासांचे प्रजनन केंद्र बनते.
रस्त्यावरील विक्रेत्यांचे अन्न खाऊ नका तसेच निरोगी खा आणि प्या.
जास्त वेळ ओल्या कपड्यात तसेच एसी चालू असलेल्या खोलीतही बसू नका.