जगातील विविध देशांबद्दल तुम्हाला अनेक मनोरंजक तथ्ये सापडतील, जी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. अशीच एक अश्यर्यचकित करणारी बाब म्हणजे, गेल्या 95 वर्षांत या देशात एक ही मूल जन्माला आले नाही. चला जाणून घेऊ या...
जगात अनेक अनोखे आणि आश्चर्यकारक तथ्ये आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल.
जगात असा एक देश आहे जिथे 95 वर्षांत एकही मूल जन्माला आले नाही.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा अस्तित्वात आल्यापासून येथे एकही मूल जन्माला आलेले नाही.
या देशाची लोकसंख्या फक्त 800-900 लोक एवढीच आहे.
इटलीतील रोम येथे असलेल्या या राज्याचे नाव वेटिकन सिटी आहे, जे जगातील सर्वात लहान देश आहे.
हे रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्माच्या सर्व धार्मिक नेत्यांचे घर आहे आणि पोपचे राज्य आहे.
दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक वेटिकन सिटीला भेट देण्यासाठी येतात, परंतु या देशात कोणालाही कायमचे नागरिकत्व दिले जात नाही.
येथे नागरिकत्व जन्माने मिळत नाही, तर तात्पुरते नागरिकत्व पद आणि सेवेच्या आधारावर दिले जाते.
वेटिकनचे रहिवासी हे पुजारी, नन आणि इतर चर्चशी जोडलेले आहे. जे लग्न करत नाहीत किंवा कुटुंब सुरू करत नाहीत.
येथे राहणारे रहिवासी प्रामुख्याने असे लोक आहेत ज्यांना लग्न करण्याची किंवा पालक बनण्याची परवानगी नाही. तथापि, येथेही अपवाद दिसून आले आहे.