राम मंदिराच्या उत्खननात सापडले हे 8 धक्कादायक पुरावे

श्रीराम जन्मभूमी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीदरम्यान झालेल्या उत्खननात नुकत्याच धक्कादायक बाबी समोर आल्या

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी या उत्खननाची माहिती दिली.

या उत्खननात 8 तुटलेले खांब, 6 भंगलेल्या मुर्त्या , 5-6 मातीची भांडी आणि 6-7 कलश मिळाले आहेत.

हे 21 वर्षांपूर्वी म्हणजे 2002 मध्ये ASI टीमला उत्खननादरम्यान सापडले होते.

हे अवशेष 500 वर्षे जुने असल्याचा दावा साधू संतांनी केला आहे.

21 वर्षांपूर्वी रामलला मंदिराच्या गर्भगृहाभोवती उत्खननादरम्यान हे सापडले होते.

अवशेषांमध्ये काळ्या कसौटी दगडाचे खांब, गुलाबी वाळूच्या दगडापासून बनवलेल्या देवतांच्या मूर्ती, मातीचे कलश आणि मंदिरातील कोरीव दगडांचे तुकडे यांचा समावेश आहे.

हे अवशेष रामललाच्या तात्पुरत्या मंदिराच्या एक्झिट गेटजवळ सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.

रामललाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना हे अवशेष गॅलरीत पाहायला मिळतील.