इथे शाळेच्या फीमध्ये पैशांच्या जागी प्लास्टिकच्या बाटल्या घेतल्या जातात

शिक्षणाचे सर्वात महत्त्वाचे माध्यम म्हणजे शाळा. आसाममध्ये अशी एक शाळा आहे जिथे शुल्काऐवजी प्लास्टिकच्या बाटल्या जमा कराव्या लागतात.

आजच्या काळात शाळेची फी खूप महाग आहे आणि त्यासाठी पालकांना बचत करावी लागते.

अशा परिस्थितीत आसाममधील एक शाळा सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय होत आहे.

आसामच्या या शाळेत पैशांऐवजी प्लास्टिकच्या बाटल्या फी म्हणून घेतले जातात.

आसाममधील गुवाहाटी येथे असलेल्या या शाळेचे नाव अक्षर फोरम आहे, येथे ग्रामीण भागातील शंभर मुलांना शिक्षण दिले जाते.

पैशांऐवजी इथली मुलं दर आठवड्याला 25 रिकाम्या पाण्याच्या बाटल्या जमा करतात.

परिसरातील अस्वच्छता आणि शिक्षणाचा अभाव पाहून परमिता आणि मजीन यांनी ही शाळा उघडली.

या शाळेत गोळा केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर अनेक प्रकारच्या वस्तू तयार करण्यासाठी केला जातो.