Sania Mirzaआणि Shoaib Malik खरोखर वेगळे होणार आहेत का? त्यांची Love Stroy कशी आहे जाणून घ्या ?

टेनिस स्टार सानिया मिर्झाने तिच्या आत्मचरित्रात सांगितले आहे की, तिची आणि शोएबची पहिली भेट ऑस्ट्रेलियात झाली होती.

सानियाचा साखरपूडा संपुष्टात आला होता आणि मनगटाच्या शस्त्रक्रियेनंतर टेनिसमध्ये परतण्याचा प्रयत्न करत होती.

सानियाची खेळाची कामगिरी चांगली होत नव्हती, शोएब मलिकही पाकिस्तानी संघाबाहेर होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले.

सानिया भारताची आणि शोएब पाकिस्तानचा. लोकांनी त्यांच्या नात्याला राष्ट्रीय आणि धार्मिक मुद्दा बनवले.

अखेर दोघांच्या प्रेमाचा विजय झाला आणि काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2010 मध्ये लग्न केले.

लग्नाच्या जवळपास 8 वर्षानंतर सानियाच्या घरात बाळाचा जन्म झाला. या लग्नातून त्यांना एक मुलगा आहे, त्याचे नाव इजहान मिर्झा मलिक आहे.

सानियाच्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत. मात्र, आता या जोडप्यामध्ये मोठा दुरावा निर्माण झाला असून ही गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली आहे.

सानियाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिने 'व्हेयर गो ब्रोकन हर्ट्स' असे लिहिले आहे. तेव्हापासून हे दोघे वेगळे होणार असल्याची चर्चा आहे.

आता ही फक्त अफवा आहे की सत्य हे पाहायचे आहे. हे खरे ठरले तर त्याच्या चाहत्यांची मनं नक्कीच तुटतील.