लाखो रुपयांच्या नोटांनी सजवलेलं हे गणेश मंदिर

भारतात गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो पण ही सजावट पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल

बेंगळुरूमधील एक गणपती मंदिर लाखो रुपयांच्या चलनी नोटांनी आणि नाण्यांनी सजले आहे.

बेंगळुरूच्या जे.पी शहर परिसरात असलेल्या श्री सत्य गणपती मंदिरात दरवर्षी गणेश पूजा महोत्सवात अनोखी सजावट केली जाते.

सुमारे 2 कोटी 6 लाख रुपयांच्या नोटा आणि 52.50 लाख रुपयांची नाणी लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून सण-उत्सवादरम्यान मंदिराच्या सजावटीसाठी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून, मंदिर व्यवस्थापनाने फुले, कणसाचे दाणे आणि कच्च्या केळीसारख्या वस्तूंनी सजवले आहे.

यावेळी पंडालच्या सजावटीमध्ये देशाच्या कामगिरीचाही उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये चांद्रयान 3 च्या यशाचा समावेश आहे.

मंदिर आणि मंदिरात बांधलेल्या पंडालसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.