इस्टर संडे सणाबद्दल 10 मनोरंजक गोष्टी

मान्यतेनुसार ख्रिश्चन धर्माचा मुख्य सण इस्टर संडे बद्दल 10 मनोरंजक गोष्टी

Webdunia

पाम संडेच्या दिवशी येशू जेरुसलेममध्ये दाखल झाले, गुड फ्रायडेला सुळावर लटकवण्यात आले आणि इस्टर संडेला ते जिवंत दिसले.

इस्टर संडेच्या दिवशी फक्त एक स्त्री, मेरी मॅग्डालीनने त्यांना त्यांच्या कबरीजवळ जिवंत पाहिले.

सुळावर चढवल्यानंतर येशू ख्रिस्ताचा मृतदेह एका गुहेत ठेवून त्याच्या समोर एक दगड ठेवण्यात आला होता.

ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त जिवंत दिसले होते, त्याच ठिकाणी एक चर्च बांधण्यात आले आहे ज्याला चर्च ऑफ द होली स्कल्पचर म्हणतात.

मॅग्डालीन रविवारी सकाळी आली आणि तिने पाहिले की कबरेतून दगड काढला गेला आहे.

मॅग्डालीनने शिमोन पीटरसह सर्व शिष्यांना बोलावले आणि प्रत्येकाने पाहिले की येशूचे शरीर तेथे नव्हते.

सर्वजण निघून गेल्यावर मॅग्डालीनला कबरीत 2 देवदूत दिसले आणि जेव्हा ती वळली तेव्हा तिला येशू तिथे उभा असल्याचे दिसले.

येशूने मॅग्डालीनला सांगितले की मी माझ्या परमपित्याकडे जात आहे आणि तू माझ्या भावांकडे जा.

मग मॅग्डालीनने सर्व शिष्यांना सांगितले की तिने प्रभूला पाहिले आहे.

मग येशू प्रेषितांना ज्ञान देण्यासाठी आणि चर्चची स्थापना करण्यासाठी 40 दिवस या जगात राहिले आणि नंतर ते स्वर्गात गेले.