माघ पौर्णिमेच्या दिवशी करा हे 7 उपाय

पुराणांमध्ये माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व मानले गेले आहे. या दिवशी 7 गोष्टी अवश्य करा-

Webdunia

या दिवशी दान आणि दक्षिणा यांचे बत्तीस पट फळ मिळते. म्हणूनच याला बत्तीसी पौर्णिमा असेही म्हणतात.

माघ महिन्यात प्रयागात स्नान केल्याने जे फळ मिळते ते दहा हजार अश्वमेध यज्ञ करूनही मिळत नाही.

स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात.

माघ महिन्यात गंगेच्या तीरावर कल्पवास केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो.

माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान माधवांची उपासना केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि सुख, सौभाग्य, धन, संतती आणि मोक्ष प्राप्त होतो.

माघ पौर्णिमेला काळ्या तिळाने हवन आणि काळ्या तिळांनी पितरांचे तर्पण केल्याने त्यांना मुक्ती मिळते.

पूजा किंवा उपवास केल्यानंतर दुपारी एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न आणि दान द्या.