गोविंदा आला रे आला.... मुंबईत दहीहंडी उत्साहात साजरी
राज्यात मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे
ठिकठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर यंदाप्रथमच मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे
मुंबईतील दादरमध्ये शुक्रवारी जन्माष्टमी साजरी करण्यात आली
दहीहंडीत मडके फोडण्यासाठी मानवीसाखळी करत दहीहंडी फोडतात
कृष्ण नामाच्या गजरांत ती फोडली जाते आणि आनंदोत्सव साजरा केला जातो
तरुणांसाठी हा एक विलक्षण उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस असतो
श्रीकृष्णाला दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती