भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केलं जातं. पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केलं जातं.