श्रावणात 7 प्रकाराने शिवजींना प्रसन्न करा
श्रावण महिना सुरु आहे, भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या 7 गोष्टी करा
तांब्याच्या कलशात शुद्ध पाण्यात गंगाजल मिसळून शिवलिंगावर मंत्रोच्चार करताना हळूहळू जल अर्पण करा.
अखंड बिल्व पानावर चंदनाचा तिलक लावून भगवान शंकराला अर्पण करा.
बेलपत्र, धोत्रा , आक, बोर, संत्री अर्पण केल्याने शिवजी प्रसन्न होतील.
पंचामृताने अभिषेक केल्यानंतर भगवान शंकराला चंदन, भस्म, अत्तर आणि रुद्राक्ष अर्पण केल्यास त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
रात्री शिव मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावा आणि शिव मंत्राचा 108 वेळा जप करा.
शुद्ध नदी, तलाव, किंवा तळ्यातील पाणी कळशीत किंवा तांब्याच्या भांड्यात भरून पायी चालत शिव मंदिरात जावे आणि शिवलिंगाचा जलाभिषेक करावा.
मंदिराबाहेर बसलेल्या गरिबांना भरपोट खाऊ घाला आणि नंदी बैलाला हिरवा चारा खाऊ घातला तर शिवजी प्रसन्न होतील.