जेवणाचे ताट वाढण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

जमिनीवर पाण्याने एक चौरस मंडळ तयार केले जाते आणि त्यावर एक ताट ठेवले जाते,किंवा पाटावर ताट ठेवावे.

ताटाच्या मध्यभागी भात, पुलाव, शिरा वाढतात.

चावण्यायोग्य अन्नपदार्थ जसे चपाती, पराठा हे ताटाच्या डाव्या बाजूला वाढा.

ताटाच्या वरील बाजूला मध्यभागी मीठ वाढा.मिठाच्या डावीकडे लिंबू, लोणची, खोबऱ्याची चटणी, इतर चटणी वाढा.

मीठाच्या डाव्या बाजूला ताक, खीर, वरण,भाज्या, सॅलड वाढा.

ताटात कधीही तीन पोळ्या, पराठे किंवा पुर्‍या वाढल्या जात नाही.

ताटाच्या उजव्या बाजूला पाण्याचा ग्लास ठेवा.

जेवणाचे ताट पितळ्याचे किंवा चांदीचे असावे. पाण्याचा ग्लास तांब्याचा असावा.