पतंग उडवण्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे?

मकर संक्रांतीला पतंग उडवणे हा केवळ एक खेळ नाही तर त्यामागे त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. चला जाणून घेऊया...

उत्तरायण हे सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचे पर्व आहे.

संक्रांत हा आध्यात्मिकदृष्ट्या सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस मानला जातो.

या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जातो.

असे मानले जाते की आकाशात पतंग उडवताना आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचतात आणि आपली पापे दूर होतात.

मान्यतेनुसार, देवांचा दिवस मकर संक्रांतीपासून सुरू होतो.

मकर संक्रांतीच्या दिवशी गंगानदी भगीरथाच्या मागे मागे गेली आणि कपिल मुनींच्या आश्रमातून समुद्रात पोहोचली.

म्हणूनच मकर संक्रांतीला गंगासागर (पश्चिम बंगाल) येथे मेळा भरतो.

पतंग उडवण्यामागील मुख्य कारण म्हणजे काही तास सूर्यप्रकाशात घालवणे.

वसंत ऋतू देखील या दिवसापासून सुरू होतो आणि भारतात पिकांच्या आगमनाच्या आनंदासाठी हा सण साजरा केला जातो.