श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन

पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर १३० वर्षे जुने आहे

दरवर्षी देश- विदेशातून असंख्य भक्त ह्या गणेशाच्या दर्शनाला येतात

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते

अनेक वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीत त्यांनी आपला एकुलता एक पुत्र गमावला

नंतर त्यांनी आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी ह्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली

ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट समाजोपयोगी कामांना मदत करण्यात अग्रेसर आहे

मंदिराच्या मुख्य गणेश मूर्तीचा 10 मिलियन रकमेचा विमा उतरवला गेला आहे