Janmashtami 2022 श्रीकृष्ण जन्माष्टमीला ही 10 कामे करावीत

जर तुम्हाला श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी या 10 गोष्टी अवश्य करा

जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचे बालस्वरूपाचा जन्म उत्सव साजरा करावा

जन्मानंतर त्यांना शंखात दूध टाकून अभिषेक करावा. दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल या पाच गोष्टींनीही अभिषेक करू शकता

अभिषेकनंतर कन्हैयाला सुंदर कपडे घाला, मुकुट घाला आणि त्यांना सुसज्ज झुल्यात बसवा

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी धार्मिक स्थळी जाऊन फळे आणि धान्य दान करा

लहान कान्हासाठी बासरी आणि मोराची पिसे आणा. पूजेच्या वेळी ते परमेश्वराला अर्पण करावे

जन्माष्टमीच्या दिवशी लहान कान्हाला लोणी आणि साखरेचा प्रसाद द्या. तसेच कान्हाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करावा

एक ते पाच वर्षांच्या कोणत्याही मुलाला तुमच्या बोटाने लोणी- साखर चाखायला द्या

या दिवशी गाय- वासराची मूर्ती किंवा फोटो घरी आणा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवून त्यांची पूजा करा

गायीची सेवा करा. गायीला चारा किंवा भाकरी करून खायला द्या आणि आशीर्वाद घ्या

परमेश्वराला पिवळे चंदन अर्पण करा. पिवळे वस्त्र परिधान करून हरसिंगार, पारिजात किंवा शेफाली यांची फुले अर्पण करावीत