कोणती वस्तू दान केल्याने काय होते?

हिंदू धर्मात दानाला खूप महत्त्व आहे, जाणून घ्या कोणती वस्तू दान केल्याने काय होईल-

Webdunia

पाण्याचे दान : पाण्याची भांडी ठेवून किंवा मंदिरात माठ ठेवून जलदान केल्याने चंद्रदोषांपासून मुक्ती मिळते.

गुळाचे दान : गुळाचे दान केल्याने सूर्यदेवतेची कृपा प्राप्त होते आणि प्रत्येक कामात यश मिळण्याबरोबरच मान-सन्मानही वाढतो.

फळांचे दान : गरिबांना किंवा मंदिरात फळे दान केल्याने संतान प्राप्ती होते.

दही दान : कुंडलीत शुक्र ग्रह अशुभ असेल तर दही दान केल्याने चांगले फळ मिळते आणि सुख-समृद्धी मिळते.

तांदूळ दान : तांदूळ दान केल्याने चंद्रासोबत शुक्राचे फळ मिळते. आई आणि पत्नीचे आरोग्य चांगले राहील.

तेल दान : तेल दान केल्याने शनीची दशा, महादशा, साडेसाती, ढैय्या इत्यादीपासून मुक्ती होऊन सुख-शांती मिळते.

मीठ दान : मीठ दान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो. सर्व प्रकारची संकटे दूर करून तुम्हाला शुक्राचे चांगले फळ मिळते.

वस्त्र दान : यामुळे शुक्र आणि बुध यांच्या शुभ परिणामांमुळे जीवनात धनवृद्धी होते.

हळद आणि केशर : हळद किंवा केशर दान केल्याने भाग्य जागृत होते आणि आयुष्य वाढते. त्याऐवजी हरभरा डाळ, पिवळे कपडे किंवा पिवळी फळे दान करू शकता.