गुरुपौर्णिमेला काय करावे?
गुरुपौर्णिमेला काही विशेष कार्य केल्याने आपल्याला गुरु आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो
या दिवशी गुरु वेदव्यास यांची पूजा केली जाते. उपासनेचा मंत्र: "गुरुपरंपरासिद्धयर्थं व्यासपूजां करिष्ये"
तुमच्या गुरूला किंवा शिक्षकाला पुष्पहार अर्पण करा आणि शाल आणि श्रीफळ भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे.
उपास ठेवून दिवसभर श्री विष्णूचे ध्यान करा आणि भगवान सत्यनारायणाची कथा ऐका.
या दिवशी अन्न, वस्त्र, छत्री, ब्लँकेट इत्यादी दान करणे शुभ असते.
या दिवशी केवळ गुरुच नाही तर आई, वडील, मोठा भाऊ, मोठी बहीण, काका इत्यादींचाही आदर केला जातो.
काही ज्ञान किंवा सिद्धी शिकण्यासाठी या दिवशी गुरुकडून दीक्षा किंवा मंत्रही प्राप्त होतो.
या दिवशी पितरांना तर्पण देण्याचे कामही केले जाते, यामुळे पितर प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात.