श्राद्ध पक्षात या 11 वस्तूंचे दान का करावे

पादत्राणे दान केल्याने सुख-शांती मिळते. शनि-राहू दोष दूर होतो

कपडे दान करताना धोतर, टोपी किंवा गमछा दिला जातो

असे मानले जाते की यम मार्गात पितरांचे रक्षण छत्रीने केले जाते. त्यामुळे पितरांचे छत्र-सावली कायम राहते

तिळाचे दान केल्याने व्यक्तीला ग्रह-नक्षत्राच्या बाधापासून मुक्ती मिळते आणि संकटांपासूनही संरक्षण होतं

तूप दान केल्याने घरगुती वाद होत नाहीत आणि कौटुंबिक जीवन सुखी होते

गुळाचे दान केल्याने पितरांना विशेष समाधान मिळतं. घरात लक्ष्मीचा वास राहतो

धान्य दान केल्याने संततीच्या वाढीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही

मिठाचे दान केल्याने मनुष्याला भूतबाधा यापासून मुक्ती मिळते

चांदीने चंद्र आणि सोन्यामुळे गुरू आणि सूर्याचे अडथळे दूर होतात. चांदी-सोने दान केल्याने कुटुंबात सुख-शांती नांदते

गो-दान केल्याने मोक्ष प्राप्ती होते. हे दानही प्रतिकात्मक पद्धतीने केले जाते

शिधा दान ते करतात जे लोक श्राद्ध दरम्यान भोजन देऊ शकत नाहीत