बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (18:14 IST)

मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

सोलापुरात 4 जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने आंदोलक यात सहभागी झाले. या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार तसेच माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केलं. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा निघाला. या मोर्चाच्या निमित्तानं शहरात येणारे सर्व मार्गवर नाकेबंदी करण्यात आली होती तर मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली होती.  मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली होती.
 
या मोर्चाला भारतीय जनता पार्टीचं उघड समर्थन होतं. यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातले सात आमदार दोन खासदार तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर इत्यादी नेते हजर होते. सोबतच भाजपचे इतर पदाधिकारी देखील हजर होते या सर्व पदाधिकाऱ्यांवर तसेच नरेंद्र पाटील आणि मोर्चाच्या सोलापुरातील समन्वयकांवर सोलापूर मधील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
 
या मोर्चाला नरेंद्र पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य,आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राम सातपुते,आमदार राजेंद्र राऊत, राजेंद्र मिरगणे, महापौर श्रीकांचना यन्नम, पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे,रणजितसिंह मोहिते पाटील,प्रशांत परिचारक   माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते. 
 
भांदवी कलम 188, 269, 270, 336 आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मोर्चाच्या समन्वयकांसह दोन खासदार सात आमदार आणि महापौरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
यामध्ये मोर्चाचे समनव्यक किरण पवार, राम जाधव यांच्यासह माजी आमदार नरेंद्र पाटील खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य, खासदार रणजित निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान अवताडे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार राम सातपुते, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह  46 जण आहेत.